Uday Samant SaamTv
Video

Eknath Shinde : पेच कायम! शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? | Marathi News

Mahayuti News : महायुतीने आज सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर आता गृहमंत्रिपदावर ठाम असलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Saam Tv

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं अशी सर्व आमदारांची इच्छा असल्याचं शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी म्हंटलं आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारून सरकारमध्ये सहभागी व्हावं असा आमचा प्रयत्न असल्याचंही सामंत यांनी म्हंटलं आहे. तर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी देखील एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावं, असं म्हंटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या नाराजी नाट्याला आज पूर्णविराम लागला आहे. भाजपकडून मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात टाकली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारतील का? याबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. यावर आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत असून शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं आणि सरकारमध्ये राहावं असा प्रयत्न शिंदे गटाचे आमदार करत असल्याचं उदय सामंत यांनी म्हंटलं आहे. तर भाजपचे गिरीश महाजन यांनी देखील याबद्दल बोलताना मागची पाच वर्ष देवेंद्र फडणवीस देखील उपमुख्यमंत्री होते. तसंच आता शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्रिपद घेऊन राज्याच्या विकासासाठी काम करावं, असं म्हंटलं आहे. त्यामुळे आता यावर शिंदे काय निर्णय घेतील हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT