Thackeray faction proposes 72 seats to MNS as alliance talks heat up ahead of BMC elections. Saam Tv
Video

Maharashtra Politics: मनसे–ठाकरे गट युतीला वेग; मनसेसाठी किती जागांचा प्रस्ताव? गणित आलं समोर|VIDEO

Sandeep Deshpande Statement On MNS–Shiv Sena Alliance: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चा वेग घेत आहेत. ठाकरे गटाने मनसेला ७२ जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली असून, मनसेकडून काही प्रमुख मतदारसंघांमध्ये अधिक जागांची मागणी करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युतीच्या हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाने मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेला प्रत्येकी दोन, म्हणजेच एकूण ७२ जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये प्राथमिक सहमती झाली असली तरी, मनसेने काही प्रमुख मतदारसंघांमध्ये तीन जागांची मागणी केल्याचे समजते. यावर संदीप देशपांडे प्रतिक्रिया देताना म्हटले की, मुळात अजून शिवसेना आणि मनसे या युतीची ज्या दिवशी राजसाहेब घोषणा करतील, त्या दिवशी मला स्वतः आपल्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देता येईल. अजून अशा प्रकारची कुठलीही घोषणा किंवा निर्णय हा राजसाहेबांनी जाहीर केला नाहीये. त्यामुळे या गोष्टीमध्ये बोलण्यास मी असमर्थ आहे. त्यामुळे आता जागावाटपावर अंतिम निर्णय कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : साधू हत्याकांडातील आरोपीला भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हिंदुत्वाचा अपमान? उद्धव ठाकरे कडाडले

कोकणात राणे बंधू आमने-सामने, भावांच्या संघर्षाला नारायण राणेंचा आशीर्वाद?

टीम इंडियाला धक्का, शुभमन गिल दुसऱ्या टेस्टमधूनही संघाबाहेर; कर्णधारपदाची जबाबदारी कुणाकडे?

BJP Congress Alliance: शिंदेंविरोधात भाजप-काँग्रेसची एकी, कोल्हापुरात कुस्तीत दोस्ती

मुंबईसाठी भाजपचा 'MY' फॉर्म्युला, महिला, युवकांची मतं मिळवण्यासाठी रणनीती

SCROLL FOR NEXT