raigad news  saam tv
Video

Raigad Fort: तिथीनुसार राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड किल्ला "छत्रपती शिवाजी महाराज की जय" च्या घोषणांनी निनादला|VIDEO

352nd Shivaji Maharaj Coronation Ceremony at Raigad Fort: रायगड किल्ल्यावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली असून लाखो शिवभक्तांनी रायगडवर उपस्थित राहून "जय भवानी, जय शिवाजी"चा जयघोष केला.

Omkar Sonawane

रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांनी रायगडावर हजेरी लावली असून, संपूर्ण गड भगव्या रंगाने न्हाऊन निघाला आहे.

राज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला गडावर अभूतपूर्व उत्साह पहायला मिळाला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात दिवट्या नाचवल्या जात होत्या. अंगारख्यातील तरुण पारंपरिक वेशभूषेत 'शिवगुणगान' गात नाचताना दिसत होते. शिवाजी महाराजांच्या जयघोषात अवघा गड दुमदुमून गेला होता.

गडावरच्या राजसदरेत पारंपरिक दिवट्यांच्या नृत्याने उपस्थित शिवभक्त मंत्रमुग्ध झाले. युवावर्गाने 'शिवरायांच्या' गीतांवर जल्लोषात नृत्य सादर केले, त्यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडवर धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा सोहळा अधिकच देखणा आणि भव्यदिव्य ठरतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: स्वच्छ आणि ग्लोईंग त्वचेसाठी आठवड्यातून २ वेळा लावा घरी बनवलेला हा फेसपॅक

Mango Ice Cream : रात्री आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा होते, मग घरीच बनवा टेस्टी मँगो आईस्क्रीम

Summer Sunscreen Using Tips: सनस्क्रीन लावताना तुम्हीही 'या' चुका करताय का? जाणून घ्या उन्हाळ्यात सनस्क्रिन कशी लावायची?

LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

Maharashtra Live News Update: गॅस दरवढीच्या विरोधात सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT