Shivsena UBT SaamTv
Video

Shivsena UBT : आमची वज्रमूठ कायम, आम्ही १०० टक्के उद्धव ठाकरेंसोबतच असणार; ९ खासदारांचं पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर | VIDEO

Shivsena UBT PC : उद्धव ठाकरें शिवसेनेचे सहा खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यानंतर ठाकरे गटाच्या सगळ्या ९ खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन यावर प्रत्युत्तर दिलं आहे.

Saam Tv

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यावर आज आमदार संतोष बांगर यांनी देखील असाच दावा केला आहे. त्यानंतर ठाकरे गटाच्या सगळ्या ९ खासदारांनी पत्रकार परिषद घेऊन यावर प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे गट हा एकसंघ असल्याचा संदेश या सर्व खासदारांनी दिला आहे.

खासदार अरविंद सावंत यांनी यावर भाष्य करताना म्हटलं की, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही, विसंवाद सुरू आहे. बहुमताने सरकार येऊनही रोज नवीन नवीन बातम्या दिल्या जात आहेत. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या जात आहे, असा आरोप करत आमची वज्रमूठ कायम असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सातत्याने समोर येत असलेल्या बातम्यांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशी पुडी सोडली जात आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.

तसंच, ठाकरे यांच्या खासदारांबद्दल आणि निष्ठेबद्दल जनमाणसांत मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा आम्ही निषेध करत असून आम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष सोबत आहोत. त्यामुळे जे कोणी या बातम्या सोडत आहेत, त्यांनी आजचे चित्र पहावे, असे आव्हानही खासदार अरविंद सावंत यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT