Shivsena Symbol Hearing Saam Tv
Video

Shivsena: शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचे? सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी

Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Priya More

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दुपारी २ वाजता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. शिंदेसेनेचे वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करणार आहेत. गेल्या सुनावणीत कोर्टानं चिन्ह गोठवून दोन्ही गटांना नवी चिन्हं का दिली नाहीत? असा सवाल केला होता. त्यावर सर्व अधिकार निवडणूक आयोगाचे असून त्यांनी नियमानुसार निर्णय घेतल्याचा युक्तिवाद शिंदेंच्या पक्षानं कोर्टासमोर केला होता. आजच्या सुनावणीमध्ये कोर्टात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे राहिल.

शिवसेना पक्ष आणि चिन्ही कुणाचे हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सुरू असलेला युक्तीवाद संपला आहे. आता शिवसेना शिंदेगटाचा युक्तीवाद सुरू आहे. मागच्या सुनावणीवेळी बाळासाहेब ठाकरेंची बनवलेली पक्षघटना उद्धव ठाकरेंनी का चुकीच्या पद्धतीने बदलली असा सवाल शिंदेसेनेच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केला होता. आजच्या सुनावणीत देखील शिंदेसेना काय युक्तीवाद करते आणि कोर्टात नेमकं काय घडतंय त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट

Pravin Tarde: बॉलिवूडवाले अंत्यविधीला न आल्याने नाना पाटेकरांचं मोठेपण कमी होत नाही...; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान ठाकरे गटाला मोठा धक्का; पक्ष प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

Bedroom Decoration Ideas For Couple : रोमॅन्टिक कपलसाठी बेडरूम डेकोरशनच्या 5 भन्नाट आयडिया, आनंददायी वाटेल

Navratri 2026 : नवरात्रीत देवीसमोर 'या' दिशेला लावा अखंड दिवा; घरात येईल पैसाच पैसा

SCROLL FOR NEXT