Devotees bidding enthusiastically at Shirsgaon Siddheshwar Temple annual auction. Saam Tv
Video

बाबोsss ! २० हजाराला कोथिंबीर जुडी, ४१ हजाराला एक नारळ, पाहा VIDEO

Shirsgaon temple auction 2025: सांगली जिल्ह्यातील शिरगाव सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला २० हजार आणि नारळाला ४१ हजार रुपयांची बोली लागली. या लिलावातून मंदिर समितीला पावणे दोन लाख रुपये मिळाले.

Omkar Sonawane

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात झालेल्या लिलावात सगळ्या वस्तूंच्या दराने सगळे विक्रम मोडीत नवा उच्चांक प्रस्थापित केला. या मंदिरात श्रद्धेतून झालेल्या लिलावात कोथिंबीर जुडीला तब्बल 20 हजार रुपये इतका दर मिळाला. तर मानाचा नारळ तब्बल 41 हजार रुपयांना खरेदी करण्यात आला.

शिरगाव येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. त्यानंतर समारोपाला पुरण पोळी दुध भात असा प्रसाद केला जातो. पुरण पोळीचा आस्वाद घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक येतात. यंदा तर सुमारे आठ हजार लोकांनी पुरण पोळीचा आस्वाद घेतला. या महाप्रसादानंतर शिल्लक राहिलेल्या विविध वस्तूंचा लिलाव दुसऱ्या दिवशी मंदिरात होतो. त्यातून मिळालेल्या पैशातून मंदिरात वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. या लिलावात सगळा गाव सहभागी होतो.

यंदाच्या लिलावात प्रत्येक वस्तूचा दर शंभर रुपये निश्चीत करण्यात आला होता. मात्र श्रद्धेतून या लिलावात मोठी चढाओढ लागली होती. त्यातून अनेक वस्तूंना मोठ्या रकमेची बोली लागली. लिलावात उत्तम चौगुले यांनी कोथिंबीर जुडी वीस हजारांना घेतली. गहू सुरेश आंबी यांनी बारा हजार रुपयांना, तांदूळ शिवाजी हवालदार यांनी तेरा हजारांना, हरभरा डाळ अविनाश शिंदे यांनी साडेनऊ हजारांना, चटणी संपत पाटील यांनी १७००० रुपयांना, पडदे विक्रम पाटील यांनी १७०० रुपयांना, तर मानाचा नारळ खरेदीसाठी मोठी चढाओढ लागली. त्यात गजानन पाटील यांनी बाजी मारत हा नारळ तब्बल ४१ हजार रुपयांना खरेदी केला. या लिलावातून मंदिर समितीला पावणे दोन लाख रुपये मिळाले. हा लिलाव मोठ्या उत्साहात होतो. चढाओढ असली तरी त्यात श्रद्धा अग्रस्थानी असते

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Notes : बनावट नोटा प्रकरणी आणखी एकास अटक; कोल्हापूरमधून आणखी साडेसहा लाखांच्या बनावट नोटा जप्त

Savalyachi Janu Savali: 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत मोठा ट्विस्ट; लवकरच होणार 'या' दोन कलाकारांची होणार दमदार एंट्री

Gadchiroli : अवैध रेती उत्खनन; मंडळ अधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारावर कारवाईची शिफारस

Diwali 2025: 100 दिवसांनी दिवाळीला बनतोय दुर्मिळ योग; हंस-केंद्र त्रिकोण राजयोगाने घरी येणार लक्ष्मी, पदोपदी मिळणार पैसा

Maharashtra Live News Update: नागपूर रेल्वे स्टेशनवर माफियांचे आणि कुख्यात हिस्ट्रीशीटरचे वर्चस्व, शिवसेनेचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT