Chagan Bhujbal SaamTv
Video

Chhagan Bhujbal : हे पक्षाचं शिबिर, एक व्यक्तीचं नाही; छगन भुजबळ स्पष्टच बोलले, पाहा Video

Rashtrawadi Congress Convention : शिर्डीत आज राष्ट्रवादीचं शिबिर होत आहे. त्या शिबिराला छगन भुजबळ देखील उपस्थित असल्याने त्यांची नाराजी दूर झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam Tv

महायुतीच्या मंत्रिमंडळात डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे अद्यापही नाराज आहेत. मात्र आज शिर्डीमध्ये भरलेल्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी भुजबळ यांनी उपस्थिती लावली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी गळ घातली म्हणून मी आलो, मात्र म्हणून नाराजी दूर झाली, असं नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी यावेळी पत्रकारांना दिली आहे.

यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, नाराजी वगैरे दूर झाली असं नाही. हे पक्षाचं शिबिर आहे. कोणत्याही व्यक्तिचं शिबिर नाही. मला काल प्रफुल्ल पटेल हे दोन तास येऊन भेटले. थोडा वेळ तरी तुम्ही शिबिराला यायला हवं असं त्यांनी म्हटलं आणि प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील फोन करून मला शिबिराला येण्याची गळ घातली. म्हणून मी आज इथे आलो आहे. मात्र नाराजी दूर झाली असं नाही, असं स्वत: छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT