Maharashtra Chief Minister x
Video

Maharashtra Politics : माझ्यासारखे २४२ आमदार आहेत, म्हणून तुझा मुख्यमंत्री, शिंदेंसेनेचे आमदाराचे विधान

Suhas Babar 242 MLAs remark on Chief Minister : शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांच्या “आमच्यासारखे २४२ आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत” या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या वक्तव्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.

Namdeo Kumbhar

Shinde Sena MLA Suhas Babar controversial statement : शिवसेना शिंदे गटाचे सांगलीचे आमदार सुहास बाबर यांनी वादग्रस्त विधान केलंय. आमच्यासारखे 242 आमदार आहेत, म्हणून मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांना विचारा सुहास बाबर कोण आहे? असं देखील चॅलेंज आमदार बाबर यांनी दिलंय. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने खानापूर तालुक्यातील करंजे जिल्हा परिषद गटातील पळशी येथे आयोजित सभेतून आमदार सुहास बाबरांनी हे विधान केलं आहे. तालुक्यातील काँग्रेस,राष्ट्रवादी शरद पवार, अजित पवार पक्ष,ठाकरे गट आणि भाजपा आपण चालवतो, असं देखील आमदार बाबर यांनी सांगितले. विटयाचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे नेते वैभव पाटलांच्यावर टीका करताना बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबाबत हे भाष्य केले आहे.

मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार सुहास बाबरांना टोला

शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास बाबर यांनी विट्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारा वेळी राज्यातले भाजपसह सर्वच पक्ष मी चालवत असल्याचे भाष्य केले होते. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांच्या या विधानाची भाजपनेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला. आमदार सुहास बाबर आणि त्यांचे वडील अनिल बाबर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांनी असे का म्हटले? हे त्यांना मी फोन करून विचारतो. ते जर सर्व पक्ष चांगले चालवत असतील तर चांगलेच आहे ना? असा टोला त्यांनी आमदार सुहास बाबर याना यावेळी बोलताना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुर्ती, ड्रेस आणि साड्यांवर सुंदर दिसतील शॉर्ट मंगळसूत्र, लेटेस्ट, ट्रेंडी 5 डिझाईन्स

मोठी बातमी! मनोज जरांगेंची निर्णायक आंदोलनाची घोषणा, तारीखही सांगितली, फडणवीसांना काय दिला इशारा?

Diabetes : पावसाळ्यात थोडासा निष्काळजीपणा मधुमेहींसाठी घातक, 'या' गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास समस्या आणखी वाढेल

Cyber Crime : '1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील खांडबारा गावात अन्न औषध प्रशासन विभागाची धाड

SCROLL FOR NEXT