Baramati by election saam tv
Video

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीसाठी मोठ्या हालचाली; शरद पवार मैदानात?, VIDEO

Baramati Bypoll : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार दिला जाणार असल्यानं बिनविरोध निवडीचा पेच निर्माण झाला आहे. अशातच शरद पवार ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nandkumar Joshi

बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल असे सुरुवातीला बोलले जात होते. मात्र, काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देणार असल्याचे काँग्रेसने जाहीर केल्यानं येथील बिनविरोध निवडणुकीचा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे शरद पवार हे स्वतः काँग्रेसच्या हायकमांडसोबत चर्चा करून बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मैदानात उतरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई- गोवा महामार्गावरील वेरळ येथे पुन्हा दरड कोसळली

Ghavachi Kheer Recipe: पावसाळ्यात संध्याकाळी गोड खायची इच्छा होते? घरी झटपट बनवा टेस्टी गव्हाची खीर, वाचा रेसिपी

वजन कमी करण्यासाठी कोणता योगा करावा?

School Holiday: कोणकोणती शहरं आणि जिल्ह्यात आज शाळा- कॉलेजला सुट्टी, जाणून घ्या एका क्लिकवर...

'गर्व से कहो हम हिंदू है...'; उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर?

SCROLL FOR NEXT