Video

अजित पवारांचे शिलेदार नरहरी झिरवाळांना शरद पवारांकडून शाबासकी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar Applauds Narhari Zirwal : वनरंग २०२६ आदिवासी संस्कृती महोत्सवात शरद पवारांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. आदिवासी कला, संस्कृती आणि विकासासाठीच्या उपक्रमामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Bharat Jadhav

मुंबईतील नरिमन पॉइंट येथील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये तीन दिवसीय राज्यस्तरीय ‘वनरंग २०२६’ आदिवासी संस्कृती महोत्सव सुरू आहे. आदिवासी समाजाची समृद्ध कला, संस्कृती, लोकपरंपरा, हस्तकला आणि जीवनशैली मुंबईच्या मध्यवर्ती भागात अनुभवण्याची संधी मुंबईकरांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळतेय. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे महत्त्व आणखी वाढले. यावेळी आदिवासी समाजाच्या विकासासाठी , त्यांच्या कला-संस्कृतीला व्यासपीठ मिळवून दिल्यानं मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रतिभाताई पवार, पद्मश्री पुरस्कारप्राप्त तारपा वादक भिकल्या धिंडा, युगेंद्र पवार, कल्याण-डोंबिवलीच्या महापौर हर्षाली थविल, माजी आमदार सुनील भुसारा, उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर, बिग बॉस फेम शिव ठाकरे, प्रवीण गायकवाड, अभिनेत्री मेधा धांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

नरहरी झिरवाळांच्या प्रयत्नांचे कौतुक

आदिवासी समाजाचा विकास, त्यांचे हक्क आणि पारंपरिक कला यांना व्यापक ओळख मिळवून देण्यासाठी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रयत्नांची कार्यक्रमात विशेष चर्चा झाली. आदिवासी भागातील तरुणांना शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसारख्या उपक्रमांवर भर देण्यात येत आहे.

काय म्हणाले मंत्री झिरवाळ

या कार्यक्रमाबाबत बोलताना मंत्री झिरवाळ म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला 9 ऑगस्ट आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो आणि हा तीन दिवसाचा कार्यक्रम पूर्वी मी एकच दिवस कार्यक्रम करत होतो कारण आजच पहिल्यांदा कार्यक्रम करतो असं नाही नववं वर्ष कार्यक्रम करतोय परंतु दरवर्षी त्याला पुन्हा पुन्हा सपोर्ट मिळायला लागलाय जनतेचा सपोर्ट मिळायला लागलाय म्हणून वाटायला लागलं का बाबा बाबा आपण चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी करावा आणि जड जंगल जमीन याचं जे नात आहे ते कशा पद्धतीने याचं प्रदर्शन त्या ठिकाणी दाखवावं समाजातल्या काही नावीन्यपूर्ण गोष्टी केलेल्या लोकांना पुरस्कार द्यावा.

लोककला, लोकसंगीत आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा संगम

‘वनरंग २०२६’मध्ये भिल्ल, कोकणा, ठाकूर आणि गोंड समाजाच्या लोककला, पारंपरिक नृत्य, लोकसंगीत, हस्तकला, पारंपरिक वेशभूषा आणि खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडत आहे. एनसीपीएसमोरील मरीन ड्राइव्हवर प्रसिद्ध कलाकार चेतन राऊत यांनी साकारलेले आदिवासी मोज़ेक आर्ट इन्स्टॉलेशन तसेच प्रसिद्ध छायाचित्रकार कोलस्टन जुलियन यांच्या छायाचित्र प्रदर्शनालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात मुलांना दूध देताय? ७ चुका पडू शकतात महागात

Maharashtra News Live Update: एकवेळ मी फाशी घेईन पण समाजाला फसवणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचे भाविक आश्वासन

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या एक आठवड्यापूर्वी शरीरात दिसतात हे 8 मोठे बदल, वेळीच धोका ओळखा

Chanakya Niti: 'या' ४ लोकांसमोर रडणे म्हणजे स्वतःचाच घात करणे, मोलाचा सल्ला नक्की वाचा

Lonavala Fort : लोणावळ्याजवळचे 'हे' ऐतिहासिक किल्ले पाहिलेत का? ट्रेकिंग प्रेमींसाठी खास ठिकाणे

SCROLL FOR NEXT