Amit Shah Saam TV News Marathi
Video

शरद पवरांच्या खासदाराने घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

Sharad Pawar NCP MP Dhirajsheel Mohite Patil meets Amit Shah : माढ्याचे राष्ट्रवादी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे सोलापूर आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

Namdeo Kumbhar

Dhirajsheel Mohite Patil meets Amit Shah : माढ्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मागील काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटलांनी जाहीर सभेत मला जेलमध्ये टाका मी सोलापूरसाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे असं विधान केलं होतं. त्यामुळे राम सातपुते आणि मोहिते पाटलांमधील राजकीय संघर्ष सुरूच आहे. अशातच त्यांनी अमित शाहांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय.

या भेटीने सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्या मागील काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूक प्रचारात सातपुते आणि मोहिते पाटील यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देण्यात आले होते. धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहीर सभेत मला जेलमध्ये टाका मी सोलापूर जिल्ह्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे अशी भूमिका घेतली होती. दरम्यान अकलूजमध्ये राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असतानाच खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. मोहिते पाटील यांच्या भेटीने राजकीय चर्चांना पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. भेटीत नेमकी काय चर्चा झाली या याची ही चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT