SHARAD PAWAR LETTER TO FADNAVIS; RAVINDRA CHAVAN REACTION saam tv
Video

शरद पवारांनी पत्र लिहून मदतीची मागणी करणं अनपेक्षित; रविंद्र चव्हाणांचा टोला|VIDEO

Ravindra Chavan Reaction On Sharad Pawar Letter To Maharashtra CM: महाराष्ट्रातील शेतकरी संकटाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत पवारांचे पत्र अनपेक्षित असल्याचे म्हटले.

Omkar Sonawane

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतल्याने बळीराजा हा चिंतेत सापडला आहे. या उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावरूनच आता राजकारण तापलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमाला मुलाखत देत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी याआधी ही अनेकवेळा सांगितले वातावरणात होणारे बदल, पावसाची अनियमितता या सगळ्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. पण महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. शरद पवार यांनी मुख्यमंत्री, कृषिमंत्री म्हणून काम केले आहे. ते फार मोठे नेते आहेत. सर्वसाधारणपणे 4 ऑक्टोबर ही तारीख असते. तो पर्यंत सरकार म्हणून विचार करता येत नाही. शरद पवारांना हे सगळं माहित असून त्यांनी तसं पत्र लिहिणं अपेक्षित नाहीये. परंतु मी मागणी केली म्हणून कदाचित त्यांनी पत्र लिहिलं असेल असा टोला रवींद्र चव्हाण यांनी शरद पवार यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिशा सालियन प्रकरणात ठाकरेंनी सत्तेचा गैरवापर केला? तपास यंत्रणेवर काय म्हणाले भाजप प्रदेशाध्यक्ष?

BSNL Recharge Plan: फक्त १ रुपयात २४ दिवसांचा रिचार्ज प्लॅन; २४GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, जाणून घ्या फायदे

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

SCROLL FOR NEXT