Supriya Sule rushes to Breach Candy Hospital after Sharad Pawar is admitted. Saam Tv
Video

Sharad Pawar Hospitalised : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; बैठक सोडून सुप्रिया सुळे तातडीने रुग्णालयाकडे रवाना

Sharad Pawar Health Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी नियोजित बैठक अर्धवट सोडून रुग्णालयाकडे धाव घेतली.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar Hospitalised Today : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही माहिती समजताच खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली नियोजित बैठक अर्धवट सोडून तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वीही शरद पवार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. (Sharad Pawar Admitted Breach Candy Hospital Mumbai Supriya Sule Leaves Meeting Urgently Reaches Hospital Latest Breaking News)

शरद पवार यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत काय अपडेट येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होती. सकाळी ११ वाजताच बैठकीला सुरूवात झाली होती. पण शरद पवार ब्रीज कँडी रूग्णालयात दाखल झाल्याचे समजताच सुप्रिया सुळेंनी बैठक सोडून रूग्णालयात धाव घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Threat: मुंबईला पुन्हा बॉम्बने उडवून देण्याची धमकी, BMC ला पाठवण्यात आला ईमेल; पोलिस यंत्रणा सतर्क

Smartphone Tips : रात्री ब्लँकेटमध्ये फोन चार्जिंगला लावताय? ३ चुका बॅटरीचा खेळ संपवतील

Mumbai Indians: आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सचा मोठा डाव, कर्णधारपदाबाबत एका फोटोमधून दिले महत्त्वाचे संकेत!

Western Railway : लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांची लोकल वांद्र्यापर्यंत धावणार; काम अंतिम टप्प्यात

Shocking : मित्रासोबत निर्जन ठिकाणी बसलेल्या तरुणीसोबत दिवसाढवळ्या भयंकर घडलं, नागपुरात खळबळ

SCROLL FOR NEXT