Sharad Pawar gets emotional while reacting to the tragic death of Ajit Pawar in Baramati. Saam Tv
Video

कंठ दाटला, शब्दही फुटत नव्हते....अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार भावुक|VIDEO

Sharad Pawar Emotional Reaction After Ajit Pawar Death: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार भावूक झाले. साम टीव्हीशी संवाद साधताना त्यांचा कंठ दाटून आला.

Omkar Sonawane

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दु:खद घटनेनंतर राज्याचे संपूर्ण मंत्रीमंडळ बारामतीत पोहोचले असून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिकांनी परिसरात गर्दी केली आहे. सर्वत्र शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे दिल्लीहून तातडीने बारामतीत पोहोचले. तसेच शरद पवार ही हेलिकॉप्टरने गेले. यावेळी त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार भावूक झाले. हा खूप मोठा धक्का आहे. राज्याला जे नुकसान झाले आहे ते भरून निघणार नाही. या घटनेत कोणतेही राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. यामध्ये कुठलेही राजकारण नाही असे ते म्हणाले. यावेळी बोलताना शरद पवारांचा कंठ दाटून आला होता आणि काही क्षण त्यांना शब्दही फुटत नव्हते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाकडे नेण्यात आलं

Ajit Pawar Death: राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना

Ajit Pawar Death: अजितदादांनी गावकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी काम केलं; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

Ajit Pawar Death: माझ्या सगळ्या कुटुंबाचं आयुष्य घ्या पण माझ्या दादाला परत आणा, आमदार खुर्चीवर डोकं ठेवून धायमोकलून रडला; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT