Pune banner of Sharad Pawar, Ajit Pawar, and Supriya Sule with message “We Are Together” sparks statewide political chatter saam tv
Video

आम्ही एकत्रच! शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र; बॅनर पुण्यात, पण चर्चा महाराष्ट्रात | VIDEO

Sharad Pawar - Ajit Pawar : पुण्यात अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचे फोटो एकाच फ्लेक्सवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

Nandkumar Joshi

पुण्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एका फ्लेक्सची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचं कारणही तसंच आहे. या फ्लेक्सवर शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे फोटो आहेत. पण या फ्लेक्सवरील मजकुरानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. आम्ही एकत्रच असा मथळा त्यावर आहे. त्यामुळं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळं सगळीकडं राजकीय जुळवाजुळव सुरू आहे. अनेक पक्षांमध्ये इनकमिंग सुरू आहे. पक्षप्रवेश होत आहेत. राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी सुरू आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता करण गायकवाड यांनीही पुण्यात एक बॅनर लावलंय. हा बॅनर जरी पुण्यात लागला असला तरी, त्यावरचे फोटो आणि मजकूर अख्खा महाराष्ट्र ढवळून काढणारा आहे.

शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो या बॅनरवर आहेत. त्यावर आम्ही एकत्रच असा मजकूरही आहे. विचार वेगळे असले तरी,आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत. आम्ही चिंता करत नाही. गरज पडल्यास ताई-दादा एकत्र येणार आमचा विश्वास, अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर आहे. त्यामुळे सध्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच शिंदेसेना-भाजपमध्ये कुस्ती?शिंदेंकडून समज तरी धंगेकर आक्रमक

Sharad Pawar : निवडणुकांच्या आधीच शरद पवारांची मोठी घोषणा, नवा डाव टाकला

Hair Care: वेगवेगळे महागडे शॅम्पू नाही, 'या' घरगुती सामग्रीने केस गळणे होतील कमी

Cricketer Death : प्रसिद्ध कसोटीपटूचा मृत्यू, इंग्लंडमध्ये घेतला शेवटचा श्वास; क्रिकेट विश्वात शोककळा

WhatsApp Scam: व्हॉट्सअ‍ॅपवर दिवाळी ऑफरचे मेसेज येतात? सावधान, अशी घ्या काळजी, अन्यथा...VIDEO बघा

SCROLL FOR NEXT