Maharashtra Drought News saam tv
Video

Solapur Drought Ground Report: बोरी नदी कोरडीठाक! दुष्काळाचं भयाण वास्तव, साम टीव्ही न्यूजचा ग्राऊंड रिपोर्ट

Maharashtra Drought News: महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट गडद होत असून सोलापूरच्या अक्कलकोटमधील बोरी नदी पूर्णपणे कोरडी पडली आहे. नदीपात्रात पाण्याऐवजी खडक आणि माती दिसत आहे. पाणीटंचाईमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं असून आगामी काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्रावर दुष्काळाचं भीषण संकट घोंघावतंय... पावसानं ओढ दिलीय, नद्या-नाले कोरडे पडलेत आणि बळीराजा पाण्यासाठी आसुसलाय... दुष्काळाची ही भयावह दाहकता नेमकी किती गंभीर आहे, याचा आढावा घेण्यासाठी साम टीव्हीची टीम थेट ग्राऊंडवर पोहोचलीये. सकाळ समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट परिसराला भेट देत बोरी नदीपात्राची पाहणी केली. पण नदीपात्राचं विदारक चित्र पाहून परिस्थितीचं गांभीर्य अधिकच अधोरेखित झालं. ज्या नदीपात्रात डिसेंबर-जानेवारीपर्यंत पाणी असतं, तिथं आज केवळ खडक आणि माती दिसतेय.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट परिसरात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. डिसेंबर-जानेवारीपर्यंत पाण्याने भरलेली असणारी बोरी नदी यंदा मात्र पूर्णपणे कोरडी पडली आहे. नदीपात्रात पाण्याऐवजी सर्वत्र खडक आणि मातीचं दर्शन घडत आहे. विशेष म्हणजे, नदीपात्रातील गाळ आणि सुपीक माती ट्रकच्या माध्यमातून शेतशिवारात नेली जातेय. परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसशेती केली जाते. परंतु यंदा पाण्याच्या भीषण टंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.

दुष्काळाची ही भयावह परिस्थिती पाहता आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास त्याचे सामाजिक परिणामही जाणवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील नामांकित हॉटेल्स FDA ची धडक कारवाई

Henry Nicholls: हेन्री निकोल्सचा ऐतिहासिक विक्रम! भारताविरुद्ध 175 रन्सची नाबाद खेळी करत मोडला 36 वर्षांचा रेकॉर्ड

Marriage Age Gap : सुखी संसारासाठी नवरा - बायकोचं वय किती असावं?

Rahul Gandhi: मोठी बातमी! भाजपचे मंत्री आमच्या संपर्कात, राहुल गांधींच्या दाव्याने राजकारणात खळबळ

वजन कमी करण्यासाठी व्यायाम कधी करावा? सकाळ की संध्याकाळ, योग्य वेळ जाणून घ्या

SCROLL FOR NEXT