Nashik Trimbakeshwar News Saam TV
Video

Nashik News: Trimbakeshwar मंदिरात सुरक्षारक्षकांची मुजोरी? भाविकांना मारहाण-शिविगाळ केल्याचा आरोप

त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षारक्षकांनी काही भाविकांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. या सुरक्षारक्षकांविरोधात कारवाई करावी अशी मागणी भाविकांनी केली आहे.

Saam TV News

नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सुरक्षा रक्षकांनी भाविकांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. इतकंच नाही तर एका वृध्द महिला भाविकेला धक्काबुक्की केली आहे. आज सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तेव्हा चार पाच सुरक्षा रक्षकांनी सुर्यवंशी कुटुंबातील काही सदस्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना धक्काबुक्कीही केली. त्यात महेंद्र सुर्यवंशी यांच्या वृद्ध आईलाही या सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केली. त्यात आई खाली पडल्या आणि त्यांना दुखापत झाली. एकूण चार ते पाच सुरक्षारक्षकांनी घेराव घालून मारले असा आरोप सुर्यवंशी यांनी केला आहे. मंदिरातील सुरक्षारक्षकांची ही अरेरावी थांबवावी अशी मागणी सुर्यवंशी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुळशी तालुक्यात अज्ञात व्यक्तींनी लावले डोंगरांना वणवे

आता जपान-कोरियात युद्ध पेटणार? किम जोंग यांनी डागले मिसाईल

Heart Attack Prevention: चाळीशी पार केलीत? या १० सवयींनी कमी करा हार्ट अटॅकचा धोका

Bihar New CM : कौन आइल बा...मुख्यमंत्री राजीनामा देणार, बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? शपथविधीची तारीख ठरली

Face Care: उन्हाळ्यात नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन पाहिजे? मग हा घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT