Locals rush to rescue students after a school van overturned off a culvert in Bhandara district. Saam Tv
Video

नाल्याच्या पुलावरून स्कूल व्हॅन उलटली अन् 10 विद्यार्थी...; नेमके काय घडले? VIDEO

Bhandara Accident News: भंडाऱ्यात खमारी-सूरेवाडा मार्गावर स्कूल व्हॅन नाल्याच्या पुलावरून उलटल्यानं १० विद्यार्थी जखमी झाले. रस्त्यातील खड्डे चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात झाला.

Omkar Sonawane

भंडारा: रस्त्यातील खोल खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि स्कूल व्हॅन थेट नाल्याच्या पुलावरून उलटली. या भीषण अपघातात तब्बल 10 विद्यार्थी जखमी झाले असून, एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

ही घटना खमारी-सूरेवाडा मार्गावर घडली. बेरोडी येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाचे विद्यार्थी शाळेतून घरी परतत होते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकाने वाहन वळवताना व्हॅनचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन पुलावरून नाल्यात कोसळली.

घटनास्थळी नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: कोल्हापूरमधील हुपरी पालिका निवडणुकीत चिन्हावरून मोठा वाद

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT