VIDEO: शालेय शिक्षणमंत्री Deepak Kesarkar यांच्या सावंतवाडी मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत कोसळली Saam TV
Video

VIDEO: शिक्षणमंत्री Deepak Kesarkar यांच्याच मतदारसंघात शिक्षणाचा बोजवारा, शाळेची इमारत कोसळली

Deepak Kesarkar News: सावंतवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत एका बाजूने कोसळली, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात प्रशासनाचं दुर्लक्ष

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत एका बाजूने कोसळली आहे. याच शाळेच्या मतदान केंद्रावर दिपक केसरकर हे मतदान करायला येत असतात. ते राहात असलेल्या घरापासून ही शाळा अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र अस असताना देखील या शाळेच्या इमारत दुरूस्तीकडे जिल्हाप्रशासनाच दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात अशा अनेक शाळा आहेत ज्यांच्या छप्पर दुरूस्तीचा प्रश्न असेल किंवा इमारत दुरूस्तीचा प्रश्न असेल तो निर्माण झाला आहे. मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं या घटनेवरून दिसून येत आहे. सध्या या इमारतीची भिंत एका बाजूने कोसळली आहे. शाळा बंद असल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. दूसरीकडे याच शाळेत बसून मुलांना शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

Hair Care: महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स विसरा! केसगळती कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टी ठरतील फायदेशीर

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT