Shruti Vilas Kadam
केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला संतुलित आहार घ्या. डाळी, कडधान्ये, हिरव्या भाज्या, फळे आणि सुका मेवा आहारात समाविष्ट करा.
शरीर हायड्रेटेड ठेवणे केसांच्या आरोग्यासाठीही महत्त्वाचे आहे. दिवसभर पुरेसे पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यास मदत होते.
टाळूवर धूळ, घाम आणि अतिरिक्त तेल साचल्यास केसांच्या मुळांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे केसांच्या प्रकारानुसार योग्य शॅम्पूने टाळू स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.
केसांना आणि टाळूला योग्य तेलाने हलका मसाज केल्याने टाळूची काळजी घेण्यास मदत होते. मात्र तेल लावताना जोरात चोळणे किंवा नखे वापरणे टाळा.
वारंवार स्ट्रेटनिंग, कर्लिंग, ब्लो-ड्रायिंग किंवा केमिकल ट्रीटमेंट केल्याने केस कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे अशा प्रक्रियांचा अतिरेक टाळणे योग्य ठरते.
अति ताण आणि अपुरी झोप यांचा एकूण आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नियमित झोप घेणे आणि ताण कमी करण्यासाठी योग, व्यायाम किंवा ध्यानाचा आधार घेणे फायदेशीर ठरू शकते.
ओले केस जोरात विंचरणे, टॉवेलने घासणे किंवा खूप घट्ट हेअरस्टाइल करणे टाळा. केस सुकवताना आणि विंचरताना शक्य तितक्या सौम्य पद्धतीचा वापर करा.