Female Doctor’s Suicide Sparks Political and Police Scandal in Satara, Maharashtra Saam Tv
Video

Satara News: साताऱ्यातील महिला डॉक्टरवर दबाव टाकणार 'तो' खासदार कोण? VIDEO

MP Alleged Involvement In Doctor Harassment Case: साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी राजकीय आणि पोलीस दबावाचा उल्लेख केला.

Omkar Sonawane

साताऱ्यात रक्षकच भक्षक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खाकीतल्या राक्षसांच्या क्रूरतेमुळे एका निष्पाप महिला डॉक्टरचा बळी गेला आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मात्र ही आत्महत्या आहे की एका निर्दयी व्यवस्थेने केलेला खून हा प्रश्न आता सर्वांच्या मनात घर करतोय. डॉक्टरवर सतत दबाव टाकला जात असल्याचं स्पष्ट होतंय. पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलावा, असा दबाव तिच्यावर टाकण्यात आल्याचं पत्रात नमूद आहे. पण हा दबाव टाकणारा खासदार कोण? कोणत्या पक्षाशी त्याचा संबंध आहे? आणि या प्रकरणात पोलिसांनी त्या खासदाराचा शोध सुरू केला आहे का हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

महिला डॉक्टरने आपल्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला आहे की काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राजकीय दबावामुळे तिला अडचणीत आणण्यात आलं. पेशंट फिट आहे असा अहवाल द्या असा आदेश देण्यासाठी फोन आले, असा गंभीर आरोप तिने केला आहे. या सर्व दडपणाला विरोध केल्यानंतरच तिच्यावर अत्याचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्या खासदारच्या पीएने फोन केले होते याचा देखील तपास अजून लागला नाहीये. या घटनेत देखील काही राजकीय वरदहस्त आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Praful Patel: 'कुणी स्वतःला बाहुबली समजू नका'; बिहारच्या निकालानंतर पटेलांचं वक्तव्य

वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीसाठी सरकारी परवानगी; ठाकरे सेनेचा हल्लाबोल

Bihar Election: बिहारमध्ये काँग्रेसचा पराभव का आणि कसा झाला? ज्येष्ठ नेत्यानं थेट सांगितलं

Nashik Politics: भाजपला धक्का देणाऱ्या अजितदादांना नाशिकमध्ये धक्का,बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT