phaltan news Saam Tv
Video

Satara Doctor Death : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राजकीय व्यक्तीचे नाव |VIDEO

Political Person Involved In Phaltan Death Case : सातारा येथील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात राजकीय व्यक्तीचे नाव समोर आलं आहे.

Omkar Sonawane

सातारा येथील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरांनी गुरुवारी रात्री आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून राज्याला हादरा बसला आहे. महिलेने आत्महत्या करण्याआधी एक पत्र लिहिले होते. यामध्ये खासदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांचा देखील उल्लेख केला आहे. ते खासदार दुसरे कोणी नसून एका पक्षाचे आहे असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राजकीय नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. दानवे म्हणाले, त्यांनी महिला डॉक्टरवर यांना फोन करून वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासंदर्भात दबाव टाकला होता. 19 जून 2025 रोजी त्या महिला डॉक्टरांनी पोलिसांना अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत पत्र पत्र लिहिले होते. त्यानंतर 13 ऑगस्ट 2025 रोजी माहितीच्या अधिकारात कारवाई विचारली. या प्रकरणी पोलिस आणि राजकीय नेत्यांकडून झालेल्या दबावामुळे डॉक्टरांनी जीव गमावला. असा आरोप दानवे यांनी केला. तसेच त्यांना सहआरोपी करा अशी मागणी देखील त्यांनी अंबादास दानवे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'डॉक्टर महिलेची हॉटेलवर बोलवून हत्या', फलटण प्रकरणात नवा खळबळजनक दावा

Bogus Voter: मुलगा 'मराठी अन् बाप गुजराती'; कुठे नावात तर कुठे जेंडरमध्ये बदल; आदित्य ठाकरेंकडून बोगस मतदारयाद्यांची पोलखोल

Amit Shah: अमित शाहांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ; शिंदेसेना-राष्ट्रवादीत अस्वस्थता

Maharashtra Live News Update: चेंबूरमध्ये उड्डाणपुलाखाली खडी मिक्सर मशीन ट्रक अडकला

Shocking : छठ पूजेदरम्यान सेल्फी घेताना होडी उलटली; तिघे तरुण नदीत बुडाले

SCROLL FOR NEXT