धनंजय मुंडे आणि पंकजा पंकजा मुंडे यांच्यावर सारंगी मुंडे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. परळीच्या जिरेवाडीमधील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी संगनमताने कटकरस्थान करून लुबडल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. सारंगी महाजन या दिवंगत प्रविण महाजन यांच्या पत्नी आहेत. तर पंकजा मुंडे यांच्या त्या मामी आहेत. परळी पोलिसात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असली तरी अद्याप याबद्दल गुन्हा दाखल झाला नसल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.
धनंजय मुंडे आणि पंकजा पंकजा मुंडे यांनी संगनमताने परळीच्या जिरेवाडी येथील जमीन बळकावल्याचा आरोप सारंगी प्रवीण महाजन यांनी केलाय. याप्रकरणी अंबाजोगाईच्या कोर्टामध्ये दावा दाखल असून २५ नोव्हेंबर रोजी सुनावणी असल्याची माहिती सारंगी महाजन यांनी संभाजीनगरमध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. माझा राजकारणाशी काही संबंध नसल्याचं देखील यावेळी बोलताना त्यांनी म्हंटलं आहे. परळी तालुक्यातील जिरेवाडी ६३.५० आर जमीन कटकारस्थान रचून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या भावंडांनी संगनमताने लुबाडली. घरगड्याच्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचा थेट आरोप सारंगी प्रवीण महाजन यांनी केला आहे. याप्रकरणी तोडगा न निघाल्यामुळे अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात १८ ऑक्टोबर २०२४ रोजी दावा दाखल केला. त्यावर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. २५ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. परळी शहर पोलिस ठाण्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र, अद्यापही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिरेवाडी येथील ही जमीन पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीसमोर व परळी-बीड मार्गालगत असून, यातील २७ आर जागा ही शासनाने रस्ते विकासकामासाठी संपादित केली आहे. उर्वरित ३६.५० आर जमिनीचा व्यवहार हा धनंजय व पंकजा मुंडे यांच्या संगनमताने गोविंद बालाजी मुंडे याच्या माध्यमातून गोविंद माधव मुंडे, तानाजी दशरथ चाटे व पल्लवी दिलीप गीते यांच्या नावे करून आपली व आपल्या कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोपही सारंगी महाजन यांनी केला.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.