Bajrang Sonawane saam tv
Video

Bajrang Sonwane : वाल्मिक कराडला मकोका लावा, बजरंग सोनवणे यांची मागणी | VIDEO

Bajrang Sonwane News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज मस्साजोग येथे झालेल्या आंदोलनानंतर खासदार बजरंग सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर निशाणा साधला आहे.

Saam Tv

२९ नोव्हेंबर पासूनची आरोपींचे सिडिआर काढा. डॉ. संभाजी वायबसेसह पत्नीवर गुन्हा दाखल करा. मी ११ जणांची यादी पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. त्याचा तपास करावा. खंडणीखोर आरोपी मकोकामध्ये आला पाहिजे. खासदार म्हणून मी देशमुख कुटुंबाच्या सोबत आहे, अशी प्रतिक्रिया बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे. मस्साजोगमध्ये आज झालेल्या आक्रमक आंदोलनानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, २९ नोव्हेंबर वाल्मिक कराड हा केज शहरात होता, त्याने एका प्लॉटची रजिस्टरी केली अन् चार दिवसात प्रशासनाने त्याला लगेच एनओसी दिली. उज्वल निकम यांच्या माध्यमातून अन् देखरेखीखाली तपास करणार अस मुख्यमंत्री यांनी सांगितले होते, तो शब्द पूर्ण करणार आहेत की नाही. मुख्यमंत्र्यांना बीड जिल्ह्यात राजकारण चाललंय असंच दिसतंय. सुदर्शनची गाडी कानडीमाळी गावात फोडली. दरोडा टाकण्यासाठी गेला होता तो गावात. मला धोका असला काय नसला काय मला कशाची भीती नाही, मी एकदा खासदार झालो मला सर्व मिळाले, आता मेलो तरी चालेल, मात्र यांचे सर्व काढल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही, असंही सोनवणे यांनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT