Warkaris chanting Vitthal Naam as Sant Gajanan Maharaj’s Palkhi reaches Tuljabhavani Temple during the Ashadhi Pilgrimage. saam tv
Video

Ashadh Wari: गजानन महाराजांची पालखी तुळजापूरमध्ये दाखल; तुळजाभवानी मंदिरात जल्लोषात स्वागत|VIDEO

Historic Ritual Continues: आषाढी वारीनिमित्त गजानन महाराजांची पालखी तुळजापूरला पोहोचली. तुळजाभवानी मंदिर परिसरात भक्तिभावात स्वागत झाले. मंदिर संस्थानकडून जेवणाची सोय करण्यात आली. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीने परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला.

Omkar Sonawane

आषाढी वारीसाठी शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असुन ही पालखी तुळजापूर येथे दाखल झाल्यानंतर तुळजाभवानी मंदीर परीसरात आल्यानंतर मंदीर संस्थानच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी एक वेळच्या जेवणाचा शिधा प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने जपली गेली तर वारकऱ्यांच्या उपस्थितीने मंदिर परिसर गजबजून गेला होता. विठुनामाच्या गजराने आणि तुळजाभवानी देवींचा जयघोष करत आलेल्या दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT