Shrikant Shinde and Sanjay Shirsat saam tv
Video

Shrikant Shinde IT Notice: श्रीकांत शिंदेंच्या इन्कम टॅक्स नोटिशीमागचं सत्य काय? संजय शिरसाट यांनी केला खुलासा

Did Srikanth Shinde receive an income tax notice : शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आल्याचा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळातील अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मात्र, काही वेळातच शिरसाट यांनी यूटर्न घेतला आणि त्याबद्दल खुलासा केला.

Nandkumar Joshi

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेले शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनाही प्राप्तिकर विभागाची नोटीस आलीय, असं त्यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिरसाट यांनी ही माहिती दिली. आम्ही प्राप्तिकर विभागाला उत्तर देण्यास बांधिल आहोत, असंही ते म्हणाले. मात्र, काही वेळानं शिरसाट यांनी घूमजाव देखील केला.

प्राप्तिकर विभागाकडून छाननी केली जाते. मलाही नोटीस आली आहे. श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आली आहे. आणखी कुणालाही नोटीस आली असावी. याचा अर्थ आपण प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीला उत्तर द्यायचे आहे. ९ तारखेला उत्तर देण्यास सांगितले होते. त्यासाठी मी वेळ मागितली आहे. मी उत्तर देणार आहे, असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं.

श्रीकांत शिंदे यांना नोटीस आल्याचं सांगितल्यानंतर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर काही वेळातच शिरसाट यांनी घूमजाव केला. श्रीकांत शिंदेंनाही नोटीस मिळाली की काय, किंवा तुमच्यावर राजकीय दबाव आहे की काय असा प्रश्न विचारण्यात आला. श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली की नाही याची कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती. परंतु, श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलले असं वाक्य माझ्या तोंडी घालण्यात येत आहे. हा गैरसमज पसरू नये म्हणून हा खुलासा केला आहे, असंही शिरसाट यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेमध्ये चर्चा

IGI Aviation Recruitment: एव्हिशन सर्व्हिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Face Care: चेहऱ्यावर मध लावल्याने होऊ शकतात या गंभीर समस्या, वेळीच व्हा सावधान

Mumbai: १५० वर्षाचा कर्नाक पूल 'सिंदूर' ब्रिज का झाला? वाचा मुंबईकरांना फायदा काय होणार

Mumbai Accident: मुंबईत बस आणि ट्रकचा भीषण अपघात, ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT