Sanjay raut News SaamTv
Video

Sanjay Raut : कुणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळं झालं; राऊतांचा आरोप

Saam Tv

'शंका घ्यावा असाच प्रकार आहे. शौचालय साफ करणारा मुलगा गोळ्या कसं झाडतो. कुणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळं झालं आहे.' असा संशय संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. बदलापुरमधील शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधात महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आता या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत अनेक प्रश्न उपस्थित केले आणि राज्य सरकारवर टीका केली.

नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'शंका घ्यावा असाच प्रकार आहे. एखादा अपवाद वगळता एन्काऊंटर खरा नसतो. ही घटना घडली तेव्हा बदलापूरमधील जनता रस्त्यावर उतरली होती. आरोपीला आमच्या हातात द्या ही मागणी तेव्हा जनतेची होती. तेव्हा गृहमंत्र्यांनी असं करता येणार नाही म्हणून सांगितले. ज्याचा एन्काऊंटर झाला तो आणि संचालक असे रॅकेट आहे. एन्काऊंटर खरं आहे का नाही हे जनतेला माहिती आहे. जनतेवर दाखल केलेले गुन्हे देखील मागे घ्या.' संजय राऊत यांनी या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहा यांचा भाजपच्या कार्यकर्ता संवाद, बैठकीला नेत्यांची उपस्थिती

Ajit Pawar: 'आमचं दैवत पवारसाहेबच', अजित पवार यांचा पश्चाताप की रणनीतीचा भाग? वाचा Special Report

Diabetes Symptoms : डायबिटीजमुळे आंधळे व्हाल? धूम्रपान, पथ्य न पाळणाऱ्यांना अधिक धोका?

Akshay Shinde Encounter : बदलापूरचा अर्धवट बदला? चाईल्ड पोर्नोग्राफीचं रॅकेट चालवणारा संस्थाचालक मोकाट?

Maratha Reservation Protest: मराठा आंदोलन तापलं! बीडहून जालना, संभाजीनगरला जाणाऱ्या बस सेवा बंद; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT