Uddhav Thackeray saam tv
Video

Maharashtra politics: ठाकरे गटाच्या धडाडीच्या प्रवक्त्या संजना घाडी यांचा शिवसेनेत प्रवेश, उबाठाला पुन्हा खिंडार|VIDEO

Sanjana Ghadi : उबाठा गटाच्या महत्वाच्या नेत्या आणि प्रवक्त्या संजना घाडी यांनी आज शेकडो कार्यकर्त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Omkar Sonawane

लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत मविआचा दारुण पराभव झाला. यानंतर उबाठा गटाला एकनाथ शिंदे यांनी धक्केवार धक्के द्यायला सुरुवात केली असून अनेक दिग्गज नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपली कंबर कसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला अजून एक खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे.

संजना घाडी या मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत.त्या शिवसेनेच्या उपनेते असून काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून प्रवक्त्यांंची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीत संजना घाडी यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अखेर शेवटच्या क्षणी संजना घाडी यांचे नाव प्रवक्तेपदी जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे देखील त्या नाराज होत्या. आज त्यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांच्यासोबत त्यांचे पती माजी नगरसेवक संजय घाडी यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पार पडला आहे. संजना घाडी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Pakistan Airstrikes : पाकिस्तानचा पुन्हा एअरस्ट्राईक, खेळाडूंवर टाकले बॉम्ब, ८ अफगाण खेळाडूंचा मृत्यू

ST Buses : टेस्लावाल्या नेत्यांनो जरा एसटीकडेही लक्ष द्या, लाल परीची दयनीय अवस्था

Nashik : आता शत्रूची खैर नाही! नाशिकचं स्वदेशी तेजस, पाकिस्तानला धडकी

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

SCROLL FOR NEXT