former MLA joins BJP saam tv
Video

Sangram Thopate: भाजपात प्रवेश करावा ही कार्यकर्त्यांची भावना- संग्राम थोपटे|VIDEO

Maharashtra politics: काँग्रेस पक्षाला पुणे जिल्ह्यात खिंडार बसली आहे, काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे.

Omkar Sonawane

काँग्रेस पक्षाचे निष्ठावान नेते म्हणून ओळखले जाणारे संग्राम थोपटे गेल्या ४० वर्षांपासून अनंतराव थोपटे यांच्या पाठोपाठ भोर (पुणे) मतदारसंघाची धुरा समर्थपणे सांभाळत होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव हा सर्वांसाठीच एक मोठा धक्का ठरला. यानंतर त्यांनी दोन दिवसपूर्वीच कॉँग्रेस पक्षातील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असून येत्या 22 एप्रिल रोजी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करतील. आज त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेत कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना संग्राम थोपटे म्हणाले, विधानसभा अध्यक्षपद एक वर्षाहून अधिककाळ रिक्त होते त्यानंतरही महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद मिळेल अशी आशा होती. पण सेवाजेष्ठतेचा विचार करून पक्षनेतृत्वाने निर्णय घेतले. पण आता कार्यकर्त्यांची भावना आहे की सलग तीन वेळा मोठ्या शक्तींच्या विरोधात निवडून येवून देखील तुम्हाला राजकीय ताकद दिली जात नाही. त्यामुळे विकासकामांनाही खोडा लागत आहे. म्हणून आता आपल्याला बदलाचा निर्णय घेतला पाहिजे असे कार्यकर्त्यांच म्हणण आहे. आपल्याला डावललं जात आहे. अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. परंतु शेवटी तालुक्याच्या भवितव्याचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे असे थोपटे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT