Vishal Patil News Today Saam TV News
Video

Vishal Patil Video: खंत जाणवते! काँग्रेसच्या विशाल पाटील संजय राऊतांबाबत नाराजी अखेर बोलून दाखवली

Sangli Lok Sabha News: आम्ही भाजपविरोधी विचारांचे आहोत, असं सांगताना विशाल पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. राऊत जेव्हा भाजपविरोधी बोलतात तेव्हा आमच्याही मनात उर्जा येते, असंही विशाल पाटील यांनी म्हटलंय.

Saam TV News

सांगली : काँग्रेस आमदार विशाल पाटील यांनी अखेर उघडपणे संजय राऊत यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली. राऊतांनी सांगली येऊन सांगलीकरांच्या विरोधात बोलल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे थोडीशी खंत जाणवते, असंही विशाल पाटील यांनी म्हटलं. सांगलीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून सांगलीविषयी खूप मोठी चर्चा होताना दिसतेय. संजय राऊत यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे, असं पाटील म्हणाले. आम्ही भाजपविरोधी विचारांचे आहोत, असं सांगताना विशाल पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. राऊत जेव्हा भाजपविरोधी बोलतात तेव्हा आमच्याही मनात उर्जा येते, असंही विशाल पाटील यांनी म्हटलंय. शिवसेनाच हीच मराठी माणसाचा आवाज होऊ शकेल, यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उभी केली होती, हेही सांगयला विशाल पाटील विसरले नाहीत. संजय राऊत हे शिवसेनेचा आणि मराठी माणसाचा आवाज आहे, हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिली. तोच आवाज सांगलीकरांच्या विरोधात येऊन सांगली वापरला गेल्यानं थोडीशी खंत जाणवते, असंही विशाल पाटील यांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाच्या आमदाराने १३ तालुकाप्रमुखांना दिल्या नव्या कोऱ्या कार; शिवसेनेचा नवा फॉर्म्युला आला चर्चेत

मोतीलाल नगरचा कायापालट! मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा 'मास्टर प्लॅन'

LPG Rule: घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

SCROLL FOR NEXT