MNS leader Sandeep Deshpande addressing the media to clarify rumours about his political future. Saam Tv
Video

तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन, नाराजी अन् पक्षबदलाच्या चर्चेवर मनसेच्या संदीप देशपांडेंचे सूचक विधान|VIDEO

Sandeep Deshpande Statement On Joining BJP: ऐन निवडणुकीच्या काळात भाजप प्रवेशाच्या चर्चांवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मौन सोडले आहे. पक्षासाठी गरज असेपर्यंत मनसेतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Omkar Sonawane

ऐन निवडणुकीच्या महासंग्रामात गेल्या काही दिवसांपासून संतोष धुरी आणि संदीप देशपांडे यांची चर्चा सुरू आहे. संतोष धुरी यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत कमळ हाती घेतले. त्यानंतर संदीप देशपांडे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. यावरच संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केले आहे. ते म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून मी नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे.

त्यामुळे माझ्या नाराजीच्या बातम्याना पूर्णविराम देणे गरजेचे आहे. मी मनसेमध्ये असून पक्षाचे काम प्रामाणिकपणे काम करतो आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसेच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येथील, त्यासाठी मी पूर्णपणे काम करतो आहे. असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. जो पर्यंत पक्षाला माझी गरज आहे असे मला वाटते तो पर्यंत मी पक्षातच राहीन, पण ज्या क्षणी मला वाटेल की मी पक्षाचा अ‍ॅसेट नाही तर लायबिलिटी झालो, तेव्हा मी वेगळा निर्णय घेईन, असेही संदीप देशपांडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT