Samruddhi Expressway Saam TV
Video

Samruddhi Expressway : इंटरचेंज रस्ता पाण्याखाली, समृद्धी महामार्ग जलमय | VIDEO

Buldhana : समृद्धी महामार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका समृद्धी महामार्गाला बसला आहे.मेहेकर येथील इंटरचेंज टोल नाक्यावर जाण्यासाठी रस्ता पाण्याखाली गेला असून त्याला नदीचे स्वरूप आले आहे.गेल्या तीन तासांपासून हा रस्ता सततच्या पावसामुळे पाण्याखाली असून, त्यामुळे समृद्धी महामार्गावर चढणे आणि उतरणे अशक्य झाले आहे. परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

समृद्धी महामार्गावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी हा इंटरचेंज रस्ता अत्यंत महत्त्वाचा असताना, त्यावर पाणी साचल्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.मेहेकर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून, रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. पावसाचे हे थैमान थांबण्याचे कोणतेही संकेत नसल्याने नागरिकांनी अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT