Sameer Bhujbal meets BJP minister Girish Mahajan amid Mahayuti alliance tensions in Nashik. Saam Tv
Video

महायुतीत फूट? भुजबळांचा शिंदे गटाला थेट नकार; भाजपसोबतच युतीचा प्रस्ताव|VIDEO

Nashik Politics Heats Up: नाशिकच्या राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. समीर भुजबळ यांनी शिंदे गटाला स्पष्ट नकार देत केवळ भाजपसोबतच युतीचा प्रस्ताव दिला आहे.

Omkar Sonawane

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन महायुतीत नव्या समीकरणांचे संकेत दिले आहेत. समीर भुजबळ यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, 'ते (शिंदे गट) आमचे प्रतिस्पर्धी असल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर युती करू शकत नाही'. भुजबळांनी नांदगाव, मनमाड आणि येवला या तीन नगरपरिषदांमध्ये केवळ भाजपसोबतच युती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावामुळे नाशिकमध्ये महायुतीचा भाग असलेल्या शिंदे गटाला वगळले जाणार का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या घडामोडींमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ मोठा स्फोट, मेट्रो स्टेशन परिसरात वाहनांना आग

जीवाशी खेळ! शाळकरी मुलगी चालवतेय रिक्षा, ड्रायव्हर बाजूलाच, VIDEO व्हायरल

Donald Trump: भर पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प झोपले, 'स्लीपी डॉन' म्हणत नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; पाहा VIDEO

मोठी बातमी! दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरात मोठा स्फोट

'व्हाईट कॉलर' मॉड्युलचा पर्दाफाश; डॉक्टरकडं २५०० किलो स्फोटकं, असॉल्ट रायफल, पिस्तुल; दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला!

SCROLL FOR NEXT