Sambhajinagar Crime Saam Tv
Video

Crime: भरचौकात तरुणाला गाठलं, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

Sambhajinagar Crime: संभाजीनगरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. दोन तरुणांनी रस्त्यात गाठत या तरुणावर चाकूने सपासप वार केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

Priya More

छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीमध्ये जुन्या वादातून एका २७ वर्षांच्या तरुणाची भररस्त्यात दोघांनी चाकूने भोसकून हत्या केली. विपुल मधुकर चाबुकस्वार असे मृत तरुणाचे नाव आहे. छातीत चाकू खुपसून हत्या करणाऱ्या आशिष गौतम चौथमल आणि सुबोध भास्कर देहाडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. विपुल चाबुकस्वारने रामनगर येथे फटाक्यांचे दुकान सुरू केले होते.

सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो दुकान बंद करून मित्र अजय वाघसोबत गप्पा मारत बसला होता. त्यानंतर मुकुंदवाडीच्या दिशेने निघाल्यावर आरोपी सुबोध आणि आशिष चौथमल तेथे आले. त्यांनी जुन्या वादातून विपुलला चाकूने भोकसले आणि दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Acidity: अ‍ॅसिडिटीला त्रासलात? तर करा 'हे' सोपे घरगुती उपाय, मिळेल आराम

मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

नवीन व्यवसाय सुरू कराल, भाऊबीजेला नातेबंध आणखी पक्के होईल; ५ राशींच्या लोकांसाठी स्मरणात राहणारा दिवस ठरणार

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या काली माता मंदिरात वाटला गेला पैशांचा प्रसाद

आम्ही किंगमेकर आहोत...'; टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांची कारच्या टपावर बसून हुल्लडबाजी; पोलीस काय कारवाई करणार?

SCROLL FOR NEXT