Pandharpur GOOGLE
Video

Pandharpur : पंढरपूरमध्ये विठ्ठल- रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न, पाहा VIDEO

Vitthal Rukmini Royal Wedding : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आज वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा पंढरपूर मध्ये संपन्न झाला आहे. आज पासून देवांची रंगपंचमी सुरू झाली आहे ती रंगपंचमी पर्यंत सुरू राहणार आहे. आज विठुरायाला पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला होता. डोक्यावरती पगडी त्यावरती मोरपंख अशा पद्धतीचा पोशाख परिधान करण्यात आला होता. आज विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये देवाच्या अंगावरती गुलाल टाकून वसंत पंचमी साजरी करण्यात आली आहे.

विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळ्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केलेली दिसून आली. मंदिर सजावटीसाठी पाच टन देशभरातून आणलेल्या रंगीबेरंगी फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिराला सजावट करण्यात आली आहे. तर विधी साठी उभारला खास मयूर विधि मंडप भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हजारो भाविक सकाळ पासूनच मंदिरात दाखल झाले होते . २५ प्रकारची 5 टन फुले वापरून ही शाही सजावट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT