Rohit Pawar On Nilesh Ghaywal saam tv
Video

निलेश घायवळ प्रकरणात २ बड्या राजकीय नेत्यांची नावं, रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ | VIDEO

Nilesh Ghaywal : गुंड निलेश घायवळ प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. या प्रकरणात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांची नावं आली आहेत. रोहित पवार यांनी तसा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.

Nandkumar Joshi

गुंड निलेश घायवळ याच्या भावाला गुन्हेगारी रेकॉर्ड असूनही बंदुकीचा परवाना दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात आता त्यांनी भाजप नेते राम शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचीही नावं घेतली आहेत.

निलेश घायवळचे संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांच्यासोबत हितसंबंध असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. निलेश घायवळच्या भावाचे गुन्हेगारी रेकॉर्ड असूनही त्याला बंदुकीचा परवाना दिला गेला. कारण वरिष्ठ स्तरावर लोक गुंतलेले आहेत, त्यात राम शिंदे आणि गृहविभागाचा समावेश असू शकतो, असंही रोहित पवार म्हणाले.

काय म्हणाले रोहित पवार?

संतोष बांगरचं नाव चर्चेत आहे. त्यांचे फोटो अधिवेशनात निलेश घायवळसोबत दिसतात. सभापती राम शिंदे, घायवळ, बांगर हे सर्व लोक सहजपणे निलेश घायवळला घेऊन तिथं अधिवेशनात दिसतात. ज्या पवनचक्क्या असतात, तिथं जमिनी घेतल्या जातात, शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जातात. त्याच्यात निलेश घायवळ आणि त्याच्या गँगचा हात आहे. त्याला तानाजी सावंत हे स्वतः नाही, पण त्यांच्या कुटुंबातील काही लोकांचं नक्कीच पाठबळ आहे, असा दावाही रोहित पवारांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT