Rohit Pawar Saam tv
Video

Rohit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद; रोहित पवारांची माहिती

Rohit Pawar On Ajit Pawar Plane Accident: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत आहेत. १२ फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत घोषणा होणार होती. पण त्यापूर्वीच अजितदादांचं निधन झाले.

Priya More

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाची घोषणा १२ फेब्रुवारी रोजी होणार होती. यासंदर्भात अजित पवार मोठा निर्णय घेणार होता. पण त्याआधीच २८ जानेवारीला अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राजकीय घडामोडींना वेग आला. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच पुणे आणि बीडचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे देण्यात आले. आता सुनेत्रा पवार यांच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत पुन्हा चर्चांना जोर धरला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठं विधान केले आहे. लवकरच विलिनीकरणाचा निर्णय घेणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. 'दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत पत्रकार परिषद घेऊ. '१२ तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती. मी आज पत्रकार परिषद घेणार होतो. आता १६ किंवा १७ फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेतली जाईल.', असे रोहित पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MMC Elections: राजकीय हस्तक्षेपामुळे एमएमसी निवडणुकीत 'आयएमए'त फूट

Kolhapur : कोल्हापूरात थरार! मुलाने कुऱ्हाडीने केली बापची हत्या, सख्ख्या भावाचाही जीव घेतला, कारण फक्त…?

IPL 2026: CSK ला दुखापतींचं ग्रहण, धोनीपाठोपाठ हा खेळाडूही टीममधून बाहेर

Maharashtra Live News Update: चिमुकल्याने खेळता खेळता गिळले लोहचुंबक, विनाशस्त्रक्रिया डॉक्टरांनी काढले बाहेर

पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार-दुचाकीची समोरासमोर धडक; 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT