विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत ठोकला पक्षाला राम राम. कर्जत व जामखेडमधील स्वाभिमानी नेते व कार्यकर्त्यांनी रोहित पवारांच्या एकाधिकारशाही, हुकुमशाही, मनमानी कारभाराविरोधात बंड उभारण्यास सुरूवात झाली असल्याचं म्हटलं जातंय. याचा पहिला मोठा स्फोट जामखेडमध्ये झाला असून. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान केलेल्या एका जेष्ठ नेत्याने पक्षाला रामराम ठोकण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा राष्ट्रवादीचे विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात यांनी आमदार रोहित पवारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. राळेभात यांच्या या निर्णयामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.