Supporters of BJP’s Rishikesh Takale celebrate his bail with a grand dhol-tasha procession at Kalamboli after his arrest in the Maharashtra Assembly brawl case. Saam Tv
Video

Gopichand Padalkar: विधानभवनात हाणामारी करणारा पडळकर समर्थक ऋषिकेश टकलेची वाजतगाजत मिरवणूक|VIDEO

Rishikesh Takale Bail Procession: महाराष्ट्र विधानभवनातील हाणामारीप्रकरणी जामिनावर सुटलेल्या ऋषिकेश टकले यांची कळंबोली येथे ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

Omkar Sonawane

विधिमंडळातील हाणामारी प्रकरणात अटक होऊन नंतर जामिनावर सुटलेले गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक ऋषिकेश टकले यांच्या सन्मानार्थ कळंबोलीत मायाक्का मंदिर परिसरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ढोलताशा वाजवण्यात आला. महाराष्ट्र विधानभवनाच्या परिसरातील हाणामारी प्रकरणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी (शरद गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधानसभेच्या लॉबीमध्ये तीव्र वाद आणि मारामारी झाली. सुरुवातीला वाद झाले, नंतर दोन्ही गटांमध्ये एकमेकांवर हल्ले झाले.

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट नितीन देशमुख व भाजपा‑चे ऋषिकेश टकले यांना अटक करण्यात आली होती. दोघांच्या वर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

आज टकले यांची जामीनावर मुक्तता झाल्यानंतर ते आटपाडी या ठिकाणी गावी जाण्यासाठी निघाले असता गोपीचंद पडळकर यांचे समर्थक व ऋषिकेश टकले यांच्या मित्रमंडळींनी कळंबोली या ठिकाणी त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार?

एसटी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा, ६ हजार बोनस आणि...

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT