Video

आदिवासींच्या मागण्यांसाठी ‘लाल वादळ’ मुंबईच्या दिशेने रवाना, मंत्रालयाल घालणार घेराव|VIDEO

Adivasi Farmers March To Mantralaya: आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकहून निघालेले लाल वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालाय घेरावाचा इशारा देण्यात आला आहे.

Omkar Sonawane

आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीन दिवसांपासून लाल वादळ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणामधून निघाले आहे. भारतीय किसान सभा आणि माक्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लाल वादळ रविवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

हातात लाल झेंडा आणि मगाण्यांचे फलक घेऊन पायी निघालेल्या सुमारे 20 हजार मोर्चेकऱ्यांनी रविवारी 12 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 20 मिनिटे विश्रांती घेतली. यावेळी मागण्या झाल्या नाही तर 2 फेब्रुवारीला मुंबईत पोहोचल्यानंतर मंत्रालायला घेराव घालू, असा इशारा मोर्चकरांनी दिला.

त्यामुळे सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, वनजमीन, गायरान धारकांना स्वतंत्र सातबारा उतारा मिळावा, शिक्षणाचे खासगीकरण थांबवा, पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी स्थानिकांना द्या या प्रमुख मागण्यांसाठी लाल वादळ रस्त्यावर उतरले आहे. हा मोर्चा माजी आमदार जे.पी गावित यांच्या नेतृत्वात निघाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT