Rain Update News : Saam tv
Video

Maharashtra Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस; रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट, VIDEO

Maharashtra Rain Update News : राज्यात मुसळधार पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा दिला आहे.

Vishal Gangurde

राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे वीज कोसळण्याचाही घटना घडल्या आहेत. रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसाची जोरदा बॅटिंग सुरु आहे. हवामान विभागानेही याबाबत इशारा दिला होता. हवामान विभागाने रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट दिला होता. तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे चिपळूणचा सवतसडा धबधबा प्रवाहित झाला आहे. चिपळूणच्या मुसळधार पावसामुळे सवतसड्याचं रौद्ररुप निर्माण झालं आहे. सवतसडा धबधबा प्रचंड वेगाने वाहतोय. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी हा सवतसडा धबधबा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black & White : 'खालिद का शिवाजी' चित्रपटावर सरकारनं बंदी का आणली? दिगदर्शकाचा मोठा खुलासा

PMC News : बदलीसाठी आयुक्त यांच्यावर दबाव टाकणं भोवलं? पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी निलंबित

मंगळवारी उघडणार भाग्याचं कुलूप! सूर्य-चंद्र आणि बुधाची कमाल; 'या' भाग्यवान राशींना मिळणार बंपर पैसा

Ind vs Eng : पहिल्या वनडे सामन्यासाठी आदल्या दिवशीच प्लेइंग ११ ची घोषणा; आश्चर्याचा धक्का देणारा निर्णय

Maharashtra News Live Update: एफडीएचे धाड सत्र सुरूच! पुणे विभागात ३७ लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त

SCROLL FOR NEXT