Mahad Rain Saam TV
Video

Raigad : रायगडमध्ये पावसाचा 'हाहाकार'! महाडमध्ये पूरस्थिती, शाळा-कॉलेज बंद | VIDEO

Red Alert in Mahad :महाड, पोलादपूर आणि महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. महाडमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून महाड आणि पोलादपूरमधील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, महाड आणि पोलादपूर तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने आज रायगड जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. यामुळे प्रशासनाने महाड आणि पोलादपूरमधील शाळा व महाविद्यालयांना तात्पुरती सुट्टी जाहीर केली आहे.

गेल्या २४ तासांत महाड, पोलादपूर आणि महाबळेश्वर परिसरात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, सावित्री नदीच्या पाणी पातळीचा वेग प्रचंड जोरदार वेगाने वाहतो आहे. सावित्री नदी ही धोक्याच्या पातळीच्या आसपास वाहताना दिसू लागली आहे. काही ठिकाणी रस्ते बंद झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सखल भाग जलमय झाले असून, आजूबाजूच्या परिसरात पाणी साचताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT