Real-life “Rancho” from Mumbai — Vikas Bendre, the Marathi youth who helped a woman deliver her baby on a local train with guidance from Dr. Devika Deshmukh via video call. Saam Tv
Video

Woman Deliver Baby at Mumbai Ram Mandir Railway Station: रिअल लाइफ रँचो! प्रवासदरम्यान महिलेला प्रसुती कळा, मराठी तरुणाने रेल्वे स्थानकावर केली डिलिव्हरी

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये घडलेली ही थरारक घटना! गोरेगाव स्टेशनवर प्रवास करत असताना महिलेला प्रसूती कळा आल्यावर मराठमोळ्या विकास बेंद्रे या तरुणाने डॉक्टरांच्या व्हिडिओ कॉलद्वारे प्रसूती यशस्वीरीत्या पार पाडली.

Omkar Sonawane

थ्री इडियट सिनेमामध्ये रँचो प्रसूती करतो हे सगळ्यांनीच बघितले आहे. मात्र मुंबईमध्ये देखील एका मराठमोळा रँचोने सगळ्यांचेच मन जिंकून घेतले आहे. त्याचं कारण असं की, काल रात्री 12.40 च्या सुमारास गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी हाक देत ओरडू लागली. यावेळी त्याच डब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेंद्रे याने ट्रेन थांबवण्यासाठी चैन ओढली.

त्यानंतर या तरुणाने त्याची मैत्रीण डॉ देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला आणि सगळी परिस्थिति दाखवली. यावेळी डॉक्टर म्हणाले की, विकास आता तुलाच ही प्रसूती करायची आहे. जय श्री राम म्हण आणि मी जे सांगते ते कर त्याने ही संपूर्ण प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेतली. विकास बेंद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून कोणताही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सुचनांचे पालन करत ही प्रसूती यशस्वीरित्या पार पडली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्वचजन या विकास आणि डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT