Eknath shinde Saam tv
Video

Local Body Election : रवींद्र चव्हाणांनी पुन्हा डाव साधला, शिंदेंचे ठाण्यातील २ शिलेदार फोडले, पाहा व्हिडिओ

Ravindra Chavan Latest Marathi News : रवींद्र चव्हाण यांनी ठाण्यात शिंदे सेनेचे दोन प्रभावी नेते भाजपात सामील करून घेतल्याने महायुतीत पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिंदे सेना मतभेद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Namdeo Kumbhar

Mahayuti Conflict : महायुतीत एकमेकांच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आयात थांबवावी असा निरोप दिल्लीतून आल्यानंतरही भाजपनं शिंदेंना धक्का देणं सुरूच ठेवलं आहे. ठाण्यातील डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या दोन प्रभावी स्थानिक नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. यामध्ये आता शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसात राज्यात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्याआधी भाजप अन् शिंदे सेना यांच्यात धुसफूस सुरू आहे.

शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख विकास देसले आणि नेते सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे अस्वस्थ झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. या फुटाफुटीच्या राजकारणामुळे महायुतीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : पहिली बायको असताना पोलिस करत होता दुसरं लग्न, जाब विचारताच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; हिंगोलीतील संतापजनक घटना

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गोदावरीला आलेला पूर ओसरला

अस्सल गावरान स्टाईल चिवळीची भाजी कधी खाल्लीये का? एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा| Chivalichi Bhaji Recipe

Pune : पुणेकरांना मोठा दिलासा! पाण्याची चिंता मिटली, ८ दिवसांत धरणातील पाणीसाठा वाढला; वाचा ताजी आकडेवारी

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

SCROLL FOR NEXT