Ravindra Chavhan SaamTv
Video

BJP News : भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांचं नाव निश्चित? मोठी अपडेट आली समोर, पाहा Video

Ravindra Chavan News : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावर रवींद्र चव्हाण यांच्या नावाची जवळपास निश्चिती झाली आहे. याबद्दल अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Saam Tv

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्याची अधिकृत घोषणा कधी होणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती तातडीने होईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर यासंदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भाजपा महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांचं रणशिंग शिर्डीतल्या अधिवेशनातून 12 जानेवारीला फुंकणार आहे. याच अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार का, याची उत्सुकता आहे. चव्हाण यांना आताच प्रदेशाध्यक्ष केलं तर आगामी पालिका निवडणुकांची तयारी करण्यास त्यांना पुरेसा वेळ मिळेल, असंही म्हटलं जात आहे. तर बावनकुळेंकडे यांच्याकडे निवडणुका होईपर्यंत प्रदेशाध्यक्षपद कायम ठेवावं, असाही एक प्रवाह भाजपमध्ये असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे रविंद्र चव्हाण हेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. मात्र ते पालिका निवडणुकांच्या आधी की नंतर हे पहाणं आता महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! रेल्वेत नोकरीची संधी; ११४९ रिक्त जागांवर भरती; आजच करा अर्ज

Prostate Cancer Early Signs: ही ५ लक्षणं दिसली तर समजा प्रोस्टेट कॅन्सर होणारे; पुरुषांनी त्वरित घ्यावी डॉक्टरांची मदत

Zubeen Garg: जुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रसिद्ध संगीतकाराला अटक, मॅनेजरच्या घरावरही छापेमारी

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

SCROLL FOR NEXT