Bhiwandi BJP Split Mayor narayan Chaudhari saam tv
Video

BJP Split : भाजपमध्ये फूट, आता नवनिर्वाचित महापौरांसह बंडखोरांवर कारवाई होणार? प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?

BJP Split In Bhiwandi : भिवंडीत महापौरपदाच्या निवडीआधी भाजपमध्ये फूट पडली. या फुटीनंतर भाजपच्या बंडखोर नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे.

Nandkumar Joshi

महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या भाजपमध्ये भिवंडीत फूट पडली. भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडीआधी भाजपचे काही नगरसेवक काँग्रेसच्या गळाला लागले. हा भाजपला सर्वात मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. महापौर निवडीआधीच बंडखोरी केलेले नारायण चौधरी हे महापौर झाले. त्यांच्यासह इतर काही नगरसेवकांनीही काँग्रेसला साथ दिली. आता महापौर नारायण चौधरी यांच्यासह ज्या नगरसेवकांनी ऐनवेळी बंडखोरी केली, त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे संकेत स्वतः भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी दिले आहेत.

काय म्हणाले रविंद्र चव्हाण?

भिवंडीत भाजपमध्ये उभी फूट पडली. याची दखल पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नारायण चौधरी आणि इतर भाजपचे नगरसेवक आहेत, जे कदाचित बंडखोरी करतील असं लक्षात आलं; तेव्हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पक्षाच्या विरोधात गेलात तर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. त्यांना समजावण्याचा अनेकांनीही प्रयत्न केला, असे चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोल्हापूरच्या ड्रग्सचे कनेक्शन थेट चीन, हाँगकाँगपर्यंत; महाराष्ट्रात ९ महिन्यात ६१९ कोटींचं अमली पदार्थ जप्त

Maharashtra News Live Update: मुंबईकडून कर्जतकडे जाणाऱ्या फास्ट लोकल धीम्या गतीने

पुणे विधान परिषद निवडणुकीत ट्विस्ट! शिंदे गटाकडून सचिन सानप यांना उमेदवारी शिवसेनेचा भाजपला 'दे धक्का'

ठाकरे गटाचे आणखी आमदार, खासदार फुटणार? बड्या नेत्याच्या ‘मिशन टायगर’ विधानाने राजकारणात खळबळ

SSR : मतदार यादीतील SSR प्रक्रिया नेमकी काय असते? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT