Nilesh Rane And Ravindra Chavan Saam tv
Video

Maharashtra Politics: रवींद्र चव्हाण अन् निलेश राणे यांची गळाभेट, महायुतीत नेमकं चाललंय काय? VIDEO चर्चेत

Nilesh Rane And Ravindra Chavan: निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण याचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या वादानंतर आता निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांची नागपुरमध्ये भेट झाली असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

नागपुरात सुरू असेलेल्या विधीमंडळच्या हिवाळी अधिवेशनातून महत्वाची बातमी समोर आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन्ही नेत्यांची विधिमंडळ परिसरात भेट झाली. या भेटीवेळी रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांची गळाभेट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. कोकणातील स्थानिक राजकारण असो वा पैसे वाटपाचे प्रकरण यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू असल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय काय? महायुतीत सगळं काही अलबेल नसल्याचे बोलले जात होते. अशातच आता या दोन्ही नेत्यांची भेट होणे आणि त्यांनी एकमेकांची विचारपूस केल्याच्या बातमीने आता चर्चांना उधाण आले आहे. रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांचा गळाभेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT