Ravikant Tupkar warns Omkar Group over Vaijnath Sugar Factory issue, demands justice for sugarcane farmers in Beed. Saam Tv
Video

शेतकऱ्यांना ऊसाचा योग्य दर द्या, नाहीतर आंदोलन अटळ – रविकांत तुपकर|VIDEO

Ravikant Tupkar Warns: कांत तुपकर यांनी ओमकार ग्रुपला इशारा दिला आहे की वैजनाथ साखर कारखान्यात दहा लाख टन गाळप आणि शेतकऱ्यांना योग्य उसाचा दर देण्याचे आश्वासन पाळले नाही तर आगामी काळात मोठी लढाई उभी राहील.

Omkar Sonawane

वैजनाथ साखर कारखान्यावर युनियन बँकेचे मोठे कर्ज होतं आणि ते कर्ज त्या भरू शकल्या नाहीत आणि बँकेने कारखाना जप्त केला. ओमकार ग्रुपने तो लिलावात घेतला. आमच्या दृष्टीने कारखाना कोण चालवते हे महत्त्वाचं नाही तो सुस्थितीत चालवणे महत्त्वाचा आहे, आणि शेतकऱ्यांना ऊसाला भाव मिळणे महत्त्वाचा आहे. ओमकार ग्रुपने काल सांगितले की दहा लाख टन गाळप आम्ही करणार आहे. तो शब्द ओमकार ग्रुपने पाळला पाहिजे , त्या परिसरातील शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे व उसाला चांगला दर दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे.

ओमकार ग्रुपने हा कारखाना कायदेशीर प्रक्रिया करून घेतला आहे. त्यामुळे न्यायालयात दाद मागण्याचा प्रश्न नाही. आम्हाला घाणेरड्या राजकारणात अजिबात रस नाही. काल पंकजा मुंडेंच आणि माझं सविस्तर बोलणे झाले, त्यांनी मला सविस्तर कारखान्याची स्थापना पासून प्रक्रिया व इतिहास समजावून सांगितला. त्यांनी मला सांगितलं की मध्यंतरीच्या काळात कारखान्याची परिस्थिती खराब असल्याने मी कर्ज भरू शकली नाही. आणि त्यामुळे कारखाना बँकेने जप्त केला आहे. त्यामुळे तो कारखाना थेट पंकजाताईंनी विकलेला नाही तर बँकेने जप्त करून कायदेशीर प्रक्रियेतूनच तो ओमकार ग्रुपला दिला आहे.

पंकजाताईंनी मला हेही सांगितलं की 100% गाळप आम्ही करणार आहोत आणि शेतकऱ्यांना चांगला उसाचा दर देणार आहोत. ज्या ग्रुपने वैजनाथ सहकारी साखर कारखाना घेतला त्यांनी दिलेला शब्द पाळावा अन्यथा आगामी काळात मोठी लढाई आम्ही लढू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT