Ratan Tata SaamTv
Video

Tata Group : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडला; नाव आलं समोर

Saam Tv

टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रतन टाटा यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याच कुटुंबातील त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नोएल टाटा हे नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन यांचे पुत्र आहेत. त्यामुळे आता इथून पुढे टाटा ट्रस्टची धुरा रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल सांभाळणार आहेत. शुक्रवारी झालेल्या टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी रात्री अकराच्या सुमारास वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी 5.30 वाजता शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी अनेक दिग्गज नेते, कलाकार, उद्योजकांनी याठिकाणी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश हळहळला. त्यांच्या निधनानंतर आता शुक्रवारी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या सावत्र भावाची नोएल टाटा यांची नियुक्ती टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs NZ, Team India Squad: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! बुमराहकडे सोपवली मोठी जबाबदारी

Chhagan Bhujbal: येवल्यात छगन भुजबळांना कुणाचं आव्हान? मविआची काय आहे रणनीती? वाचा...

Maharashtra Politics : अजितदादा महायुतीतून बाहेर पडणार? पाहा स्पेशल रिपोर्ट,VIDEO

Dussehra Melava: बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे; मनोज जरांगे- मुंडे आमनेसामने

Darbhanga Express Acccident: तामिळनाडूमध्ये रेल्वे अपघात; दरभंगा एक्सप्रेस मालगाडीला धडकली

SCROLL FOR NEXT