मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रतन टाटा यान आदरांजली वाहिली आहे. मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या सभागृहात राज ठाकरे रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासह मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित आहेत.
बुधवारी रात्री अकराच्या सुमारास टाटा सन्सचे अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी 4 वाजता शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचं पार्थिव दर्शनासाठी एनसीपीएमध्ये ठेवण्यात आलं आहे. यावेळी अनेक दिग्गज नेते, कलाकार, उद्योजक याठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करायला येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील याठिकाणी दाखल झाले असून त्यांनी रतन टाटा यांना शेवटची आदरांजली वाहिली आहे.
2 दिवसांपूर्वी म्हणजे 17 ऑक्टोबरला टाटा आयसीयूमध्ये दाखल झाल्याची बातमी आली होती. मात्र, त्यांनी हे फेटाळत आपण बरे असल्याचे सांगितले आणि रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो असल्याचे म्हटले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.